गायन नर्तन किर्तन हरिरंग
भक्तिरसे दंग चित्त झाले
कौतुक हे देवा दरबारी तुझे
काय पुण्य माझे रुजू झाले
केले ना सायास अवचित भेटला
भाग्य उदयाला माझे आले
पंढरीचा देव उभा समाधीत
पाहुनिया संत आनंदले
सकळांना मिळो दुर्लभ हे सुख
नामघोषे दु:ख पिटाळले
अहैतुकी कृपा तुझी मजवरी
दासाला पदरी बाळगले