अलौकिकाचा हात धरून मी
लौकिकात या वावरतो
चिरंतनाचा ध्यास धरुनी
या जगण्याला मी सावरतो
नजर वळविता उत्तर मिळते
प्रश्नांनी जरी बावरतो
उणे देउनी अधिक मिळवितो
संभ्रमात जरी मी पडतो
मी करतो म्हणता गडबडतो
कर्तेपण त्याला देतो
सर्वव्यापी तो राम गड्यांनो
तुमच्यामध्ये मज दिसतो
तो दाता तो उदारधी आणि
मी त्याचा सेवक बनतो
ॐ
जय श्रीराम