नंदी आणि शिव
काढले कोरून
एकच पाषाण
द्वैत नाही
लाट व सागर
एकच ते जळ
वेगळे केवळ
नाम रूप
लाटेचे जन्मणे
लाटेचे विरणे
लाटेचे जगणे
सागरात
ईश्वरा वेगळे
आस्तित्व तुजला
नाही माझ्या मुला
ऐक माझे
तूच माझा राम
तू माझा गोविंद
तू सच्चिदानंद
परब्रह्म
आत्मा परमात्मा
एकच आहेत
आत्मबोध यात
आला सर्व
सजीव निर्जीव
सारे आत्माराम
अज्ञानाचे काम
नाही नाही
ॐ