
//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //
झाडांवर प्रेम
पक्ष्यांवर प्रेम
पिलांवर प्रेम
करा तुम्ही
प्रेमळांचा भार
वाहीन सर्वथा
ऐसे दिले संता
वचन मी
चिरायु होताल
सुखाने न्हाताल
काळीज खुशाल
खुले करा
आहे सा-यांच्यात
माझीच वसति
गुज तुम्हाप्रती
सांगतो मी