//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //
देवा तू मजला /आपला मानले /
याहून वेगळे /काय हवे //१//
शिणवटा सारा /उतरून गेला /
आपल्या ध्येयाला /प्राप्त झालो //२//
इंद्रायणी तटी /पिम्पळाच्या तळी /
बसावे जवळी /पांडुरंगा //३//
आणली शिदोरी /करावी न्याहारी /
चटणी भाकरी /खाऊ संगे //४//
सवंगडी तुझा /झालो मी सद्भावे /
तुझिया नामाने /उद्धरलो //५//
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
