//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //
हे विश्वरूप जनार्दना /मी तुज पाहात असावे /
आणि तू दिसत रहावे /मज सर्वकाळ //१//
जगद्व्यापका चैतन्या /आत्मारामा मनरमणा /
विरह कदापि साहिना /हीच आर्ति माझी //२//
तू सर्व सामर्थ्याची खाण /वाया तर्क करील कोण /
आदि अंत जाती मरुन /देवा तुजपुढे //३//
विठ्ठला आनंदनिधाना /ऐकावे तुझिया वचना /
करावे तुझिया किर्तना /द्यावे हेचि मज //४//