मन इन्द्रिये निवांत
बुद्धि घाली दंडवत
अहंकार लीन होत
बिनघोर बैसला
अनादिसिद्ध आत्मसुख
न पाही अपेक्षांचे मुख
अमृतानुभव कौतुक
न्याहाळीत बैसला
स्वसुखासी येई उत
आतबाहेरी भगवंत
परमानंद स्वये शांत
वनस्थानी बैसला
ॐ
सांगें कुमुददळाचेनि ताटे
जो जेवला चंद्रकिरणें चोखटे
तो चकोरू काई वाळुवंटे
चुंबितु आहे
ॐ