एखादे तरी पाउल टाका
शरीरसुखाच्यापुढे
पहा किती सुखदायी दुनिया
आहे त्यापलीकडे
शरीराला घेऊन सोबती
जाता येते त्याही पुढती
मोहाच्या जाळ्यात न फसता
चला ईश्वराकडे
उचला थोड्या तुमच्या माना
पहा जरा ह्रदयाच्या स्थाना
त्याही वरती सहस्त्रार ते
जाऊ त्याच्याकडे
बोलतो मी हे प्रेमापायी
कळकळ तुमची वाटत राही
सुधारणेला वाव अजुनही
आहे तुमच्याकडे
स्वत:मध्ये देवाला शोधा
मांगल्याचे तोरण बांधा
पवित्र तुमच्या देह राउळा
न्या स्वातंत्र्याकडे
ॐ
वेंकटरमणा गोविंदा
ॐ
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ।।
*