श्रीवत्सलांछन मिरविसी रामा
काय तुझ्या प्रेमा वर्णु आम्ही
शीघ्रकोपी आम्ही रामा शान्तिब्रह्मा
तुजला उपमा तूच एक
आम्ही अपराधी कृपार्णवा रामा
मूर्तिमंत क्षमा आहेस तू
पतितपावन रामा तुझे नाम
आम्ही पुण्यधाम तुझ्यामुळे
नि:शंक वाजती फुटकी खापरे
निर्लज्ज शुकरे हीन आम्ही
अधम आम्ही हे रामा तू उदार
नको लोटू दूर आम्हा कधी
*
RESPECT MOTHER NATURE
WE ARE HER CHILDREN
*