मी लहानपणी निवडुंग्या विठोबाच्या देवळात जायचो तेव्हा तेथील वातावरणाने भारुन जायचो. त्या देवाच्या पदस्पर्शाने , मुखदर्शनाने माझ्या आयुष्याचे सुगन्धित सोने केले. आम्ही शिवरात्रीला महादेवाच्या हेमाडपंथी भव्य देवळात जायचो, भक्तांच्या तुडुंब गर्दीत पिंडीवर बेल वहायाचो, त्या पिंडीच्या स्पर्शाने माझे जीवन कृतार्थ झाले.
या सर्वांना पोटाशी घेणा-या वत्सल देवांनी किती जणांची आयुष्ये मातीमोल होण्यापासून वाचावली असतील, किती जणांना पातकापासून, आत्महत्येपासून, जुगारी, व्यसनी होण्यापासून परत माघारी आणले असेल त्याची गणती करणे शक्य नाही. त्या देवांच्या उदार ह्रदयी वत्सल पुजा-यांना मी साष्टांग दंडवत घालतो.
जे पुजारी देवांच्या शुद्धते बद्दल व्यर्थ चिंता करतात त्यांना नम्र विनंती करतो की भक्तांच्या स्पर्शाने देवाचे तेज आणि महिमा जास्तच वाढतो व पुजा-यांचे पुण्य वाढते. मला कुणाविरुद्ध क्रान्ति करायची नाही. मी एवढेच सांगतो की तुम्ही कुणाला हाडझिड करताल तर तो देवळाऐवजी हातभट्टीकडे जाईल, डान्सबार, कुंटणखान्यात जाईल, भ्रष्ट, दुराचारी होईल व त्या पापाचे धनी तुम्ही व्हाल.तुकाराम महाराज देवाला डोक्यावर घेऊन दारो दार हिंडून सांगायचे,"आपुला तो एक देव करुनी घ्या हो". महाराजांचा पुण्य प्रताप व महिमा आपण पाहतोच

समाजाच्या सर्व थरातील लोकांना आग्रहाने व प्रेमाने जवळ घ्या. देव व भक्त यांच्यातील अडथळे काढून टाका. सोवळ्याच्या दुराग्रहाने भक्ति कोमेजुन जाऊ देऊ नका. देऊळ हे जर सर्व समावेशक भक्तिपिठ झाले तर समाजाच्या उर्जेला उर्ध्वगति मिळेल व हेच तुमचे कार्य आहे हे ध्यानात घ्या
हीच गोष्ट इतर कोणत्याही चर्चला, मशिदीला लागू आहे . मी जेव्हा अशा ठिकाणी दुपारच्या वेळी निराधार, गरीब माणसे गारव्याला पहुडलेली पाहतो तेव्हा मला फार आनंद वाटतो. बासर येथील सरस्वतीच्या देवळात रात्री लोक झोपतात व देवी प्रत्येकाच्या डोक्यावर हात फिरवून जाते, आशीर्वाद देते. त्याच गोष्टीचा प्रत्यय मला अशा वेळी येतो.बसल्या जागी प्रेमाने पृथ्वीचा वैकुण्ठ , कैलास किंवा देवलोक बनविणे तुम्हा पुजा-यांच्या हातात आहे. तुमची ताकद फार मोठी आहे. शाकाहाराचा हिरीरीने प्रचार करा.तो सर्वांसाठी योग्य आहे व सर्व धर्मपंथांना मान्य आहे कारण दया हा दैवी भाव आहे.
आपण निष्कलंक दिव्य जग घडवू
ॐ
कृपा करा ही कळकळीची विनंती,
कृपा करा ही कळकळीची विनंती,
फार मोठा अधिकार तुमच्या हाती आहे,
त्याचा जनकल्याणासाठी वापर करा.
ॐ
ॐ
अविनयमपनय विष्णो
दमय मन: शमय विषयमृगतृष्णाम् ।
भूतदया विस्तारय तारय संसारसागरत:। ।
ॐ