तुझे नाम घेण्यासाठी
आतुरलो होतो मीही
रामा तुला माझी कशी
आठवण आली नाही
सांग रामा का रुसला
काय माझा झाला गुन्हा
तुझे नाम घेण्याचा हा
छंद माझा आहे जुना
रामा तुझी बदनामी
रामा तुझी बदनामी
केली का मी कधी वाया
योग्यांच्याही चिंतनाचा
विषय ही तुझी काया
तुझ्या गोड बोलण्याचा
तुझ्या गोड बोलण्याचा
मिंधा झालो जन्मोजन्मी
कृपासिंधु रामा तुझी
भरती का झाली कमी
तुला सोडून मी रामा
तुला सोडून मी रामा
जाऊ कुठे सांग तरी
विभुर्व्याप्य परमेश्वरा
भरला तू चराचरी
उपाशी मी ठेवू कसा
उपाशी मी ठेवू कसा
देव भावाचा भुकेला
माझ्याविना त्रिजगति
सुख लाभेल का तुला
तुला विवंचना माझी
देवा सांभाळ दीनाला
जग म्हणेल अन्यथा
राम खोटा शिक्का झाला
तुझ्या ब्रिदाचे पालन
आता रामा तूच कर
तुझ्या चरणी ठेविले
माझे शिर दोन्ही कर
नको होउस निष्ठुर
नाही शोभत हे तुला
भक्तांच्याच कार्यासाठी
आहे जन्म तू घेतला
ॐ
आता रामा तूच कर
तुझ्या चरणी ठेविले
माझे शिर दोन्ही कर
नको होउस निष्ठुर
नाही शोभत हे तुला
भक्तांच्याच कार्यासाठी
आहे जन्म तू घेतला
ॐ