देवा, मी व्याकुळ झालो आहे व मला नेमके काय करावे ते समजत नाही.मात्र तुझे नाम तारक आहे.माझे दोष पर्वताएवढे असले तरी ते भस्मसात करण्याची ताकद तुझ्या नामात आहे. आणि तुझ्या नामाशिवाय माझे कोणीच नाही हे जाणून मी तुझे नाम उरी धरले आहे.त्यासंदर्भात प्रत्यक्ष सैतान देखिल माझे मन कलुषित करण्यास आला तरी तो स्वत: पराभूत होईल हे मी जाणतो.माझे बरे वाईट कर्म देखिल मी तुला अर्पण केले आहे. माझी एवढी लायकी नाही की मी करतोय ते भले आहे की बुरे आहे ते मला समजावे.मी शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही.जे काही थोडे थोडके जाणतो ते देखिल तुलाच अर्पण केले आहे.तूच माझा तारणहार आहे.तू मला दिशा दाखव व तूच माझा उद्धार कर.
हरि उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे
तृण अग्नीमेळे समरस झाले
तैसे नामे केले जपता हरि
ॐ
तृणीकृत्य जगत्सर्वम् राजते सकलोपरि
पूर्णानंदमयम् शुद्धम् हरेर्नामैव केवलम्
ॐ
हरि उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे
तृण अग्नीमेळे समरस झाले
तैसे नामे केले जपता हरि
ॐ
तृणीकृत्य जगत्सर्वम् राजते सकलोपरि
पूर्णानंदमयम् शुद्धम् हरेर्नामैव केवलम्
ॐ