ब-याच वेळा मनुष्याला आपल्या मनात काय असते ते किंवा आपले काय म्हणणे असते ते ओळखता येत नाही.त्यामुळे आपण मानसिक आजाराला बळी पडलो आहोत कि काय असा संशय येऊ लागतो परन्तु आपल्या मनातील विचारांचा, भावनांचा थांग लागल्यावर प्रश्न किती सोपा होता ते लक्षात येते.नंतर प्रश्नही विरघळून जातो व आपले मन प्रसन्नतेने भरून येते व पुढच्या जीवनप्रवासासाठी आनंदाची शिदोरीच आपणांस मिळते जी आपला पुढचा जीवनप्रवासही सुखकर करते.बर-याचदा आपणांस काय पाहिजे ते आपणांस माहीतही असते परन्तु समाजाच्या भ्रामक दडपणामुळे आपण त्यावर दुसरीच इतकी पुटे चढवितो कि मुळात आपल्या मनाची मागणी काय होती हेच अस्पष्ट होऊन जाते.अशावेळी आपल्या मित्रांचा व वडीलधा-यांचा योग्य तो आधार मिळाल्यामुळे आपली वाटचाल सोपी होते कारण काही गुंता आपला आपण स्वत:च सोडविणे शक्य नसते.
ज्यावेळी आपला एक माणूस सावंतवाडीचा असतो त्याच वेळी तो महाराष्ट्राचा असतो, त्याच वेळी तो भारताचा असतो, त्याच वेळी तो आशियाचा असतो, त्याच वेळी तो जगाचा असतो. अशाच प्रकारे हा परीघ विस्तारत ब्रह्मांडा पर्यंत जातो.अहं ब्रह्मास्मि या वेद वाक्याचा अर्थ हेच सांगतो कि भक्त हाच भगवंत आहे आणि आपण आपल्या आपापसातील नात्यांच्या अंतरंगात हाच अर्थ उमटलेला प्रत्यक्षातही पाहू शकतो.ही गमतीशीर गोष्ट आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडत असते परंतु आपल्याला त्याची कल्पनाच येत नाही.हे निर्मळ आनंदाचे गुप्त धन खरेतर आपल्या जवळच असतो.मात्र स्वत:कडे भक्तपणा घेऊन इतर सर्व विश्वात भगवंताला पाहिले तरच भक्तीचा खरा आनंद आपणांस घेता येतो.ही गोष्ट अनेक प्रकारे भक्त व भगवंत यांच्या नात्यास पोषक ठरते व हेच योग्य असते कारण जे लाभत नाही त्याचा ध्यास घेऊ नये असे नसून आपण लौकिक दृष्टीने जे नसतो ते आपण आहोत असे हे लोकांच्या लक्षात येइल अशाप्रकारे बडबडू नये तर आपण अलौकिक आहोत असे आपले आपणच फक्त समजुन घ्यायचे असते.
काही नाती अशी असतात कि ती एकाच वेळी माता, पिता, सखा, बंधू अशी अनेक रुपे धारण करतात व अशा अनेकपदरी नात्यांचा वेध घेणे फारच दुरापास्त होऊन बसते व या संमिश्र भावनांचे कल्लोळ आवरता येत नाहीत तसेच प्रगटही करता येत नाही.अशावेळी आपल्या व्यक्तित्वाच्या चिंधड्या झाल्यासारख्या वाटतात.खरेतर आपल्या अध्यात्मात अशा गोष्टींचा उल्लेख केलेला नाही असे नाही परन्तु आपण त्यादृष्टीने आपल्या पारंपारिक ठेव्याकडे पहात नाही.आपण देव पाषाणमुर्तींमधे शोधतो आणि माणसांतला देव हरवतो. अशावेळी आपण एखाद्या मुलीबरोबर एक मुलगा पाहतो तेव्हां आपण गृहीत धरतो कि वाईट संबंध असतील.कृष्ण हा बालक होता तेव्हां ते आपल्या लक्षात येत नाही कि ते एका बालकाचे गोपिकांशी मधुर संबंध आहेत; कृष्णाचे मधुर संबंध आहेत ते परमात्मा या भूमिकेतून आहेत व ते त्याच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या गोपिकांशी नसून आत्मा व परमात्मा यांचे मिलन आहे.हाच प्रकार कोणत्याही व्यक्तींमधील जवळीकीस आजच्या काळातही लागू होतो.कारण ते त्रिकालातीत अमृततत्व म्हणजेच भक्त-भगवंताचे अनेकपदरी नाते कोणत्याही व कितीही व्यक्तींना लागू होते व अशी मैत्री गैर अर्थाने घेऊ नये एवढेच नव्हे तर ते दोषदृष्टीने पाहणे अक्षम्य पाप असते.
एक हात पूर्वजांच्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, प्रेषित मुहमद, भगवान बुद्ध, प्रभु येशु, आदि सर्व मुक्तमौक्तिकांच्या अनादी अनंत मालिकेतील सर्व पुर्वसुरींच्या हाती देऊन दुसऱ्या हाताने वर्तमानाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो हीच सर्वव्यापी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.

ॐ
माता रामो मत्पिता रामचंद्र:
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु:
नान्यं जाने नैव जाने न जाने
ॐ
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र:
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु:
नान्यं जाने नैव जाने न जाने
ॐ
सच्चिदानंदाचा येळकोट
*
हरि ॐ तत्सत्
हरि ॐ तत्सत्
*