कशास आई भिजविसी डोळे
उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा
असे उष:काल
या गाण्या नंतर पुढच्या पिढीची कविता अशी आहे -
उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
परंतु या दोन्ही गाण्यांच्या कित्येक वर्षे आधी ज्ञानेशांनी जे लिहीले ते असे आहे -
माझा मराठाचि बोल कौतुके
अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन
माझा मराठाचि बोल कौतुके
अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन
हा विचारांतील फरक लक्षात घ्या.ज्ञानेशांच्या व्यक्तिगत जीवनात व त्याकाळातील समाज जीवनातही दु:ख होते जे या अर्वाचीन कविंच्या तुलनेत खुपच जास्त होते.परन्तु ज्ञानेशांच्या वाङ्मयात वेदनेचा लेशही नाही कारण त्यांच्या जीवनात दु:खाला व वेदनेला स्थानच नव्हते, ते अतिशय सुखात होते.
त्यानंतरही अशा प्रकारच्या सुखी संतांची मालिकाच आपणांस पहावयास मिळते जी आज पर्यंत टिकून आहे व यापुढेही राहील.खरे म्हणजे आपण आपल्या व्यक्तिगत व सामाजिक आयुष्याकडे योग्य दृष्टीकोनातुन पहात नाही.सूर्य सगळ्यांनाच प्रकाश देतो परन्तु जर आपण त्यास नाकारण्याचाच हट्ट धरला तर तो आपलाच करंटेपणा असतो.ज्ञानेशांच्याही पूर्वीपासून पारतंत्र्य होते परन्तु जे आग्रहाने स्वतन्त्र राहतात ते स्वत:सह जगासही मुक्त करू शकतात.
आपले भवितव्यच उज्वल असणार असे नाही तर आपला वर्तमानकाळ उज्वल आहे व भुतकाळही उज्वलच होता.

*
हरि ॐ तत्सत्
*