पापकर्मांची सजा ही
भोगणे जे प्राप्त झाले
त्याच दुःखातून ह्रदयी
देखणे हे कमळ फुलले
त्याग ना सगळ्या सुखांचा
जोवरी जमला मला
तोवरी मी तळमळूनी
अंती ईश्वर पाहिला
स्त्रोत हर्षाचा जगी या
शांतीमधुनी उमलतो
त्याविना कोणी जगी ना
ईश्वराला पाहतो
वैर वेड्या वासनेने
शांततेशी मांडले हे
उमगले ज्याला तयाने
ईश्वराला जाणले
योगी मी संन्यस्त जेव्हा
सर्व इच्छांमधुन झालो
कर्मयोगी राहूनी मी
नैष्कर्म्यास पावलो
आता जाणे राम मजसी
तोच करतो तोच देतो
स्तब्ध मी करतो न काही
राम कृष्ण हरी बोलतो
पांडुरंग हरी