
काय हे गोविंदा
वैकुंठनायका
वरदान देतो
पुन्हा माघारीही घेतो
तुझ्यासाठी जीव माझा
अटीतटी येतो
मोक्षालाही सोडून
मी पुन्हा जन्म घेतो
पुन्हा जातेवेळी
तूच माझ्यापुढे येतो
तुझ्याच भोवती
माझा जीव गोळा होतो
शतजन्म माझे
तुझ्यावर ओवाळतो
मुक्तीचे ते काय मोल
भक्ति मी मागतो
देवा तुझ्या संगतीत
कृतार्थ मी होतो
तुझे गीत गातो
आणि तुलाच पहातो