तुझे नाम सोपे गाईन विठ्ठला
अन्य काही मला छंद नाही
काहीच सुचेना तुझ्याविना रामा
जीभ तुझ्या नामा घोकतसे
तुझ्याच रुपाचा नयनांस ध्यास
जीव कासाविस तुझ्यासाठी
जळो ते रुपये जळो कामकाज
माझी तजवीज रामा करी
अनन्य भक्ती तू देशील गोविंदा
मज मतिमंदा पोसशील
तुझा बळहीन गुलाम मी देवा
भरोसा तू द्यावा दीनालागी
दुर्बळांची रामा राखतोस पाठ
तूच मायपोट अनाथांचे
तुझ्या लीलेमध्ये मी नाही येणार
मी नाही जोजार करणार
खुश राहो सारे नको कुणा दु:ख अखंडित सुख आत्मलाभ
तुझ्या विरहात नको लोटू मज
देवा हितगुज ऐक माझे
पुरा झाला माझ्या भेजाचा कबाड़ा
तुझा झालो वेडा प्रेमपाशी
लाविलेस पिसे मजसी केशवा
सोडून माधवा जेऊ नको
संतांचे उष्टे मी खाऊन जगेन
चरणी राहीन दास तुझ्या
*
मच्चित: सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनंक्ष्यसि ।।
*
ॐ
राम कृष्ण हरि
ॐ
*
हरि ॐ तत्सत्
*