घडावया हवे होते
ते ते सारे घडत गेले
जानकीला कांचनाच्या
नाही मोहाने ग्रासिले
असुरांच्या विध्वंसाचा
चंग सीतेने बांधला
कर्तव्यास त्या धाडला
श्रीराम नाही फसला
दुष्ट मायावी शक्तींचे
व्हावे समूळ उच्चाटन
म्हणून गेला लंकेला
माग दाविला काढून
राम लंकेस येईल
होती जानकीला खात्री
पार पाडली रामाने
त्याची सर्व जिम्मेदारी
क्रीडा प्रकृति पुरुषाची
लोकांसाठी आदर्शाची
चुकून नाही घडली
दिव्य गाथा निश्चयाची
ॐ नम: प्रकृतिपुरुषाय शाश्वते ॐ
*