ॐ शिवमद्वैतम् ॐ
शिव हा नित्य परमात्मा असून निराकार आहे.भवानी ही त्याची इच्छा शक्ती आहे.हे दोघेही अनादी व अनंत आहेत.भवानी जगत रूपी आभास निर्माण करते. हा जगत रूपी आभास शिवाच्या अधिष्ठानावर दिसतो.हे जग असंख्य वेगवेगळ्या नाम रुपांनी व्यक्त झालेले भासते.ही सारी नाम रुपे अनित्य असतात.ती जन्म, स्थिति व लय दाखवितात.
शिवभवानी कधीही वेगवेगळी दाखविता येत नाहीत.त्यांच्यात हा शिव व ही भवानी असा भेदही करता येत नाही.ते सतत एकमेकांबरोबरच असतात. शिव व भवानी यांच्यातील द्वैत सुद्धा खोटेच {मिथ्या} असून भवानी ही शिवाचा अंगभूत गुणधर्म असल्यामुळे तिने निर्मिलेले जगताचे जन्ममरणाचे चक्रसुद्धा अनादी अनंत आहे.तसेच जीवांच्या सुख दु:ख़ास कारण होणारे कर्म सुद्धा अनादी अनंत आहे.हे जगत केवळ आभास मात्र असेल तरीही ते शिवाच्याच अधिष्ठानावर भासत असल्याने तेहि केवळ शिवरुपच असते.एकंदरीत शिव, भवानी हे जोडपे व जगत रूपी त्यांचे बाळ हे सर्व मिळून फक्त एक शिवच असतो व त्या सर्वव्यापी शिवाखेरिज कुठेही, कधीही, अन्य काहीच नसते.
एवंच त्या सर्वव्यापी सर्वेश्वराशिवाय अन्य सारे भेद समजुतीचेच आहेत.वैराग्य व सौभाग्य खरे तर एकत्रच नांदतात.परन्तु ते आपण एकाच वेळी पाहू शकत नाही.

जग का आहे याचे एकमेव कारण ईश्वरी इच्छा {म्हणजे भवानी} हेच होय. आपल्या चर्मचक्षुंना केवळ भौतिक जगच दिसते जे भवानीची निर्मिती असते. परन्तु जेव्हा आपण ज्ञानचक्षुंनी पहातो तेव्हा फक्त शिवच दिसतो. म्हणजे भवानी जेव्हा निवृत्त होते त्याच वेळी शिव दर्शन देतो. त्यानंतर मात्र आपणास खात्री पटते कि सर्व चराचरात एका शिवा वाचून अन्य काहीच नाही.अशा ज्ञानोत्तर अवस्थेत शिवभवानीचे दर्शन या सर्व जगात जिकडे पहु तिकडे सर्वत्र अनिर्बंध होऊ लागते.या अवस्थेला स्वैर समाधि असे म्हणतात. या स्थितीत भौतिक जगही शिवस्वरूपच दिसते.
*
हरि ॐ तत्सत्
*
*