देवा उपभोग / नाही रे शाश्वत /
तुझे नाम देत / सुख सदा //१//
विवंचना किंवा / वंचना कसली /
नामाची सावली / सदा शिरी //२//
देवा तू घेतले / मजला पोटाशी /
खूण ही गाठीशी / बांधली मी //३//
अंतरीची तार / जुळली आपली /
जाईना तुटली / कदापिही //४//
मागणे एवढे / झाले माझे पुरे /
आता काही नुरे / चिंता मज //५//
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २००७
खेळ
माझ्या प्रवासाला / नाही पोहोचणे /
ललाटी फिरणे / लिहीलेले //१//
रुजणे ना मज / काळात कुठल्या /
आभाळ भाळी या / कोरलेले //२//
शिकणे माझे हे / कधीही संपेना /
मजला रुचेना / पदवीदान //३//
काय मिळविणे / कुठे मज जाणे /
चक्र हे कशाला / पायी माझ्या //४//
तुझे नित्य नवे / उन्मेष पाहणे
आणि आनंदणे / पुन्हा पुन्हा //५//
तुझे वैद्यपण / माझ्या वेडावरी /
टिपरी टिपरी / वर झडे //६//
देवा तुज आहे / सोस हा कसला /
आनंद तुजला / काय मिळे //७//
असो तुझी हौस / देई मला बळ /
तुझ्यासवे खेळ / खेळतो मी //८//
ललाटी फिरणे / लिहीलेले //१//
रुजणे ना मज / काळात कुठल्या /
आभाळ भाळी या / कोरलेले //२//
शिकणे माझे हे / कधीही संपेना /
मजला रुचेना / पदवीदान //३//
काय मिळविणे / कुठे मज जाणे /
चक्र हे कशाला / पायी माझ्या //४//
तुझे नित्य नवे / उन्मेष पाहणे
आणि आनंदणे / पुन्हा पुन्हा //५//
तुझे वैद्यपण / माझ्या वेडावरी /
टिपरी टिपरी / वर झडे //६//
देवा तुज आहे / सोस हा कसला /
आनंद तुजला / काय मिळे //७//
असो तुझी हौस / देई मला बळ /
तुझ्यासवे खेळ / खेळतो मी //८//
शनिवार, २७ ऑक्टोबर, २००७
अंगीकार
देवा तू दयाळु / पाळिसी पाखरा /
नाही तरी चारा / कोण घाली //१//
वाहती या डोळा / देवा अश्रुधारा /
तुझ्या उपकारा / कैसे वर्णु //२//
तुझ्यामुळे देवा /जग हे जगते /
कोण यांना देते / अन्नपाणी //३//
तूच दया प्रेम / तूच बंधुभाव /
जगती अभाव / नाही तुझा //४//
करतो मर्दन / अभिमान्याचे तू /
लहान वासरा / दूध देसी //५//
बळी कान पिळी / हे बोल फुकाचे /
जनसामान्यांचे / तुझे राज्य //६//
अजाण बालके / किटके नाजुक /
जगती कित्येक / युगे झाली //७//
आम्ही तुझा देवा / केला अंगीकार /
तुझा शिरी भार / वागवितो //८//
नाही तरी चारा / कोण घाली //१//
वाहती या डोळा / देवा अश्रुधारा /
तुझ्या उपकारा / कैसे वर्णु //२//
तुझ्यामुळे देवा /जग हे जगते /
कोण यांना देते / अन्नपाणी //३//
तूच दया प्रेम / तूच बंधुभाव /
जगती अभाव / नाही तुझा //४//
करतो मर्दन / अभिमान्याचे तू /
लहान वासरा / दूध देसी //५//
बळी कान पिळी / हे बोल फुकाचे /
जनसामान्यांचे / तुझे राज्य //६//
अजाण बालके / किटके नाजुक /
जगती कित्येक / युगे झाली //७//
आम्ही तुझा देवा / केला अंगीकार /
तुझा शिरी भार / वागवितो //८//
रविवार, २१ ऑक्टोबर, २००७
शब्दविलय
प्रकाश अंधार / एकारले सारे /
सूर्य चन्द्र तारे / एक झाले //१//
जवळ स्वतःच / दूरचे ते झाले /
परके आपले / सारे एक //२//
तू आणि तोपण / झालो मी स्वतःच /
नपुंसक तेच / स्त्री पुरुष //३//
बाप आणि माय / बाळ स्वतः झाले /
गुढगे टेकले / व्याकरणे //४//
वर्णन करू मी / भाषेत कुठल्या /
नाही ऐकावया / दुजे कुणी //५//
डोळे दृष्टी दृश्य / आवाज व कान /
कर्म आणि ज्ञान / एक झाले //६//
शब्दाचा विलय / ध्वनी स्वतः झाला /
अशा अवस्थेला / काय म्हणु //७//
एकपणे दिली / बुडी ती स्वतःत /
अर्थ तो मौनात / विसावला //८//
देवा तू दिलीस / भक्ती मला दान /
मला तुझ्यातून / सूट दिली //९//
त्यायोगे गातो मी / तुझे गोड नाम /
नाही तरी काम / काय मला //१०//
सूर्य चन्द्र तारे / एक झाले //१//
जवळ स्वतःच / दूरचे ते झाले /
परके आपले / सारे एक //२//
तू आणि तोपण / झालो मी स्वतःच /
नपुंसक तेच / स्त्री पुरुष //३//
बाप आणि माय / बाळ स्वतः झाले /
गुढगे टेकले / व्याकरणे //४//
वर्णन करू मी / भाषेत कुठल्या /
नाही ऐकावया / दुजे कुणी //५//
डोळे दृष्टी दृश्य / आवाज व कान /
कर्म आणि ज्ञान / एक झाले //६//
शब्दाचा विलय / ध्वनी स्वतः झाला /
अशा अवस्थेला / काय म्हणु //७//
एकपणे दिली / बुडी ती स्वतःत /
अर्थ तो मौनात / विसावला //८//
देवा तू दिलीस / भक्ती मला दान /
मला तुझ्यातून / सूट दिली //९//
त्यायोगे गातो मी / तुझे गोड नाम /
नाही तरी काम / काय मला //१०//
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २००७
कैवल्य
मीच तुझ्यामधे / बुडलो गोपाळा /
होई गोपाळकाला / माझा तुझा //१//
दिवा विझताना / ज्योत मोठी होते /
तसे ज्ञान होते / मीच देव //२//
उरेना नंतर / हेच ब्रह्मज्ञान /
होत असे शून्य / अहंकार //३//
अज्ञान नेणीव / ज्ञान ते जाणीव /
दोन्हींची उणीव / उरे फक्त //४//
तुच चालवीता / तुच बोलवीता /
तुझी आहे सत्ता / देहावर //५//
म्हणती कैवल्य / या अवस्थेला /
मिळाला विठ्ठला / नैवेद्य तो //६//
होई गोपाळकाला / माझा तुझा //१//
दिवा विझताना / ज्योत मोठी होते /
तसे ज्ञान होते / मीच देव //२//
उरेना नंतर / हेच ब्रह्मज्ञान /
होत असे शून्य / अहंकार //३//
अज्ञान नेणीव / ज्ञान ते जाणीव /
दोन्हींची उणीव / उरे फक्त //४//
तुच चालवीता / तुच बोलवीता /
तुझी आहे सत्ता / देहावर //५//
म्हणती कैवल्य / या अवस्थेला /
मिळाला विठ्ठला / नैवेद्य तो //६//
पिंगा
काय मी करावे / का करावे मीच /
उरला ना पेच / आता काही //१//
सोडुनिया सारे / प्रश्न पांडुरंगा /
तुजसवे पिंगा / घालतो मी //२//
उत्फुल्ल झालो मी / प्रकाश स्वतःच /
पाहणे उगाच / आता सरे //३//
तुझ्या गतीमधे / गुंतवुनी मज /
मोकळा सहज / झालो पूर्ण //४//
ज्ञान ना उरले / जाणीव म्हणता /
नेणीव म्हणता / सारे कळे //५//
अर्थ ना उरला / वेगळा कशात /
एक भगवंत / मतलब //६//
कृपाळु बा देवा / हात ना सोड़ावा /
वाटतोय हेवा / माझा मला //७//
उरला ना पेच / आता काही //१//
सोडुनिया सारे / प्रश्न पांडुरंगा /
तुजसवे पिंगा / घालतो मी //२//
उत्फुल्ल झालो मी / प्रकाश स्वतःच /
पाहणे उगाच / आता सरे //३//
तुझ्या गतीमधे / गुंतवुनी मज /
मोकळा सहज / झालो पूर्ण //४//
ज्ञान ना उरले / जाणीव म्हणता /
नेणीव म्हणता / सारे कळे //५//
अर्थ ना उरला / वेगळा कशात /
एक भगवंत / मतलब //६//
कृपाळु बा देवा / हात ना सोड़ावा /
वाटतोय हेवा / माझा मला //७//
शनिवार, १३ ऑक्टोबर, २००७
असुरमर्दिनी
कुतर्का मारुनी / थकली तू माय /
सुखे आता जाय / मंचकासी //१//
तुझे हे भेसूर / पाहूनिया रूप /
घाबरलो खूप / बालक मी //२//
तुझे सौम्य रूप / धारण करून /
भक्तीची तहान / भागवी गे //३//
तू घेई निद्रा / भेटवी बापासी /
शिवदर्शनासी / आतुरलो //४//
देव शिवशक्ती / जीव आहे भक्ती /
दर्शनाने मुक्ती / प्राप्त होई //५//
सुखे आता जाय / मंचकासी //१//
तुझे हे भेसूर / पाहूनिया रूप /
घाबरलो खूप / बालक मी //२//
तुझे सौम्य रूप / धारण करून /
भक्तीची तहान / भागवी गे //३//
तू घेई निद्रा / भेटवी बापासी /
शिवदर्शनासी / आतुरलो //४//
देव शिवशक्ती / जीव आहे भक्ती /
दर्शनाने मुक्ती / प्राप्त होई //५//
तदाकार
नभाचा मंडप आणि
हिरवाईचा पट
सगळीकडे पहा
तुम्हा दिसेल तो नीट
माझे छोटे आस्तित्व
निसटले माझ्यातून
या विराट विश्वात
मी हरवुन गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
छोटे छोटे किडे
आले माझ्याकडे
मला ते बोलले
किती तन्मयतेने
त्याने रंगविले
त्याने आम्हाकडे
किती लक्ष दिले
किती साक्षेपाने
आम्हा घडवीले
तसेच मी पाहिले
उंच डोंगरकडे
त्यांच्या भव्यतेने
मला फार छोटे केले
त्याचे आस्तित्व
मला दिसले व्यापलेले
त्याचा स्पर्श जिथे तिथे
पाहात मी गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
माझी छोटी दुनिया ही
फार मोठी झाली
लांबी रुंदी उंची
तिची मोजवेना खोली
मला कुठे शोधू
मी दिसेनासा झालो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
हिरवाईचा पट
सगळीकडे पहा
तुम्हा दिसेल तो नीट
माझे छोटे आस्तित्व
निसटले माझ्यातून
या विराट विश्वात
मी हरवुन गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
छोटे छोटे किडे
आले माझ्याकडे
मला ते बोलले
किती तन्मयतेने
त्याने रंगविले
त्याने आम्हाकडे
किती लक्ष दिले
किती साक्षेपाने
आम्हा घडवीले
तसेच मी पाहिले
उंच डोंगरकडे
त्यांच्या भव्यतेने
मला फार छोटे केले
त्याचे आस्तित्व
मला दिसले व्यापलेले
त्याचा स्पर्श जिथे तिथे
पाहात मी गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
माझी छोटी दुनिया ही
फार मोठी झाली
लांबी रुंदी उंची
तिची मोजवेना खोली
मला कुठे शोधू
मी दिसेनासा झालो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
वेणु
दुस-याच्या हक्कावर
नको गदा आणू
दुस-याच्या आयुष्याचे
नको श्रेय घेऊ
ज्याला जे करायचे
ते करु दे सुखाने
कुणी काही करीत नाही
असे नको ओरडू
तू जरी शांत झाला
तरी जग थांबेल का
दुस-यांची शांती तरी
नको भंग करु
हे जग चालविणारा
फार मोठा आहे
छोट्यात छोट्या किटकावर
त्याचे नियंत्रण आहे
ज़रा थोडा सैल हो
ज़रा थोडा स्वस्थ हो
तू निर्धास्त हो
त्याला निवांत होऊ दे
त्याच्या वेणुचे आलाप
मग तुला ऐकू येतील
त्याच्या आनंदात मग
तूही विरघळून जाशील
नको गदा आणू
दुस-याच्या आयुष्याचे
नको श्रेय घेऊ
ज्याला जे करायचे
ते करु दे सुखाने
कुणी काही करीत नाही
असे नको ओरडू
तू जरी शांत झाला
तरी जग थांबेल का
दुस-यांची शांती तरी
नको भंग करु
हे जग चालविणारा
फार मोठा आहे
छोट्यात छोट्या किटकावर
त्याचे नियंत्रण आहे
ज़रा थोडा सैल हो
ज़रा थोडा स्वस्थ हो
तू निर्धास्त हो
त्याला निवांत होऊ दे
त्याच्या वेणुचे आलाप
मग तुला ऐकू येतील
त्याच्या आनंदात मग
तूही विरघळून जाशील
एकटा
नाही कुणी कुणाचे
सारे इथे स्वयंभू
इथले आकाश सारे
प्रत्येक एकट्याचे
सा-याच रानवाटा
विस्तीर्ण पसरलेल्या
सुखदुःख ऐसपैस
प्रत्येक एकट्याचे
मनमुक्त कंठ गातो
गाणे स्वतंत्रतेचे
दुस-यावरी न ओझे
प्रत्येक एकट्याचे
ज्याचा तयास वाटा
तक्रार ना कुणाची
ज्याची तयास साथ
प्रत्येक एकट्याची
नाही गुन्हा कुणाचा
दुस-यावरी न सत्ता
जागा जगात देव
प्रत्येक एकट्याचा
सारे इथे स्वयंभू
इथले आकाश सारे
प्रत्येक एकट्याचे
सा-याच रानवाटा
विस्तीर्ण पसरलेल्या
सुखदुःख ऐसपैस
प्रत्येक एकट्याचे
मनमुक्त कंठ गातो
गाणे स्वतंत्रतेचे
दुस-यावरी न ओझे
प्रत्येक एकट्याचे
ज्याचा तयास वाटा
तक्रार ना कुणाची
ज्याची तयास साथ
प्रत्येक एकट्याची
नाही गुन्हा कुणाचा
दुस-यावरी न सत्ता
जागा जगात देव
प्रत्येक एकट्याचा
लड़िवाळ
मी माझे थोड़े द्यावे
भरभरुन तुम्ही द्यावे
ईश्वरी हे हात तुमचे
द्यायला न लाजावे
आनंद हा युगांचा
अवघीच खुषी झाली
दिंडीमधे मिळे जी
ती संगणकात आली
गवतात जे फुले ते
निष्पाप हास्य झालो
दिसतो तुम्हामधे मी
जणू गोकुळात आलो
तुमच्यामधे दिसे हो
मज पांड़ुरंग उघडा
वरची तुम्ही आवरणे
म्हणता मलाच वेडा
रुपात रावणाच्या
मज राम स्वच्छ दिसतो
मीही मनात हसतो
परि सोंग दाखवीतो
दिसतो चराचरात
तो रंग गंध झाला
हा शब्द नाही माझा
लडिवाळ तो प्रगटला
भरभरुन तुम्ही द्यावे
ईश्वरी हे हात तुमचे
द्यायला न लाजावे
आनंद हा युगांचा
अवघीच खुषी झाली
दिंडीमधे मिळे जी
ती संगणकात आली
गवतात जे फुले ते
निष्पाप हास्य झालो
दिसतो तुम्हामधे मी
जणू गोकुळात आलो
तुमच्यामधे दिसे हो
मज पांड़ुरंग उघडा
वरची तुम्ही आवरणे
म्हणता मलाच वेडा
रुपात रावणाच्या
मज राम स्वच्छ दिसतो
मीही मनात हसतो
परि सोंग दाखवीतो
दिसतो चराचरात
तो रंग गंध झाला
हा शब्द नाही माझा
लडिवाळ तो प्रगटला
बुधवार, १० ऑक्टोबर, २००७
सामोरा
सतत रहा रे / सामोरा विठ्ठला /
नजरेआड मला / करु नको //१//
तुजवीन काही / नको देवराया /
पडतो मी पाया / विनवीतो //२//
तुजवीन माझ्या / जीवा हुरहुर /
पड़ते नगर / ओस सारे //३//
तुजला पाहणे / हाच पराक्रम /
दुजा काही धर्म / नाही मला //४//
बाकी सारे कर्म / तुझा तूच कर /
तुझ्या हाती कर / बालकाचा //५//
माझे जे नाही ते / श्रेय मज देसी /
पदारात घेसी / दोष माझे //६//
कृपाळू दातारा / तुझी आहे देन /
आमचे जीवन / तुझी लीला //७//
नको नको मज / कर्तेपणा आता /
विंधुनी अहंता / तारी मज //८//
नजरेआड मला / करु नको //१//
तुजवीन काही / नको देवराया /
पडतो मी पाया / विनवीतो //२//
तुजवीन माझ्या / जीवा हुरहुर /
पड़ते नगर / ओस सारे //३//
तुजला पाहणे / हाच पराक्रम /
दुजा काही धर्म / नाही मला //४//
बाकी सारे कर्म / तुझा तूच कर /
तुझ्या हाती कर / बालकाचा //५//
माझे जे नाही ते / श्रेय मज देसी /
पदारात घेसी / दोष माझे //६//
कृपाळू दातारा / तुझी आहे देन /
आमचे जीवन / तुझी लीला //७//
नको नको मज / कर्तेपणा आता /
विंधुनी अहंता / तारी मज //८//
बुधवार, ३ ऑक्टोबर, २००७
विठ्ठला
मन तव पायी / एकचित्त झाले/
चिंतामुक्त झाले / बालक हे //१//
तुवा समर्थाचा / आधार लाभला /
बालकासी दिला / आशिर्वाद //२//
तुझ्या हुकुमाचा / बंदा मी खाविंदा /
केशवा गोविंदा / पांडुरंगा //३//
माझा अखत्यार / नाही मी मुकुंदा /
माझा कामधंदा /नेमिला तू //४//
जग वटवट / करते हे भारी /
मजला शिसारी / येते त्याची //५//
अन्य कुणाचीही / सत्ता माझ्यावर /
नाही चालणार / हेच खरे //६//
कृपाळू बा देवा / घेई माझी सेवा /
तुझे नाम जिव्हा /घेवो माझी //७//
माझ्या नावे नको / अन्य कर्तबगारी /
तुझी मी लाचारी / पत्करली //८//
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
