काय मी करावे / का करावे मीच /
उरला ना पेच / आता काही //१//
सोडुनिया सारे / प्रश्न पांडुरंगा /
तुजसवे पिंगा / घालतो मी //२//
उत्फुल्ल झालो मी / प्रकाश स्वतःच /
पाहणे उगाच / आता सरे //३//
तुझ्या गतीमधे / गुंतवुनी मज /
मोकळा सहज / झालो पूर्ण //४//
ज्ञान ना उरले / जाणीव म्हणता /
नेणीव म्हणता / सारे कळे //५//
अर्थ ना उरला / वेगळा कशात /
एक भगवंत / मतलब //६//
कृपाळु बा देवा / हात ना सोड़ावा /
वाटतोय हेवा / माझा मला //७//
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
