नभाचा मंडप आणि
हिरवाईचा पट
सगळीकडे पहा
तुम्हा दिसेल तो नीट
माझे छोटे आस्तित्व
निसटले माझ्यातून
या विराट विश्वात
मी हरवुन गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
छोटे छोटे किडे
आले माझ्याकडे
मला ते बोलले
किती तन्मयतेने
त्याने रंगविले
त्याने आम्हाकडे
किती लक्ष दिले
किती साक्षेपाने
आम्हा घडवीले
तसेच मी पाहिले
उंच डोंगरकडे
त्यांच्या भव्यतेने
मला फार छोटे केले
त्याचे आस्तित्व
मला दिसले व्यापलेले
त्याचा स्पर्श जिथे तिथे
पाहात मी गेलो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
माझी छोटी दुनिया ही
फार मोठी झाली
लांबी रुंदी उंची
तिची मोजवेना खोली
मला कुठे शोधू
मी दिसेनासा झालो
तदाकार झालो
मी तदाकार झालो
शनिवार, १३ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
