मी माझे थोड़े द्यावे
भरभरुन तुम्ही द्यावे
ईश्वरी हे हात तुमचे
द्यायला न लाजावे
आनंद हा युगांचा
अवघीच खुषी झाली
दिंडीमधे मिळे जी
ती संगणकात आली
गवतात जे फुले ते
निष्पाप हास्य झालो
दिसतो तुम्हामधे मी
जणू गोकुळात आलो
तुमच्यामधे दिसे हो
मज पांड़ुरंग उघडा
वरची तुम्ही आवरणे
म्हणता मलाच वेडा
रुपात रावणाच्या
मज राम स्वच्छ दिसतो
मीही मनात हसतो
परि सोंग दाखवीतो
दिसतो चराचरात
तो रंग गंध झाला
हा शब्द नाही माझा
लडिवाळ तो प्रगटला
शनिवार, १३ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
