मीच तुझ्यामधे / बुडलो गोपाळा /
होई गोपाळकाला / माझा तुझा //१//
दिवा विझताना / ज्योत मोठी होते /
तसे ज्ञान होते / मीच देव //२//
उरेना नंतर / हेच ब्रह्मज्ञान /
होत असे शून्य / अहंकार //३//
अज्ञान नेणीव / ज्ञान ते जाणीव /
दोन्हींची उणीव / उरे फक्त //४//
तुच चालवीता / तुच बोलवीता /
तुझी आहे सत्ता / देहावर //५//
म्हणती कैवल्य / या अवस्थेला /
मिळाला विठ्ठला / नैवेद्य तो //६//
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
