सतत रहा रे / सामोरा विठ्ठला /
नजरेआड मला / करु नको //१//
तुजवीन काही / नको देवराया /
पडतो मी पाया / विनवीतो //२//
तुजवीन माझ्या / जीवा हुरहुर /
पड़ते नगर / ओस सारे //३//
तुजला पाहणे / हाच पराक्रम /
दुजा काही धर्म / नाही मला //४//
बाकी सारे कर्म / तुझा तूच कर /
तुझ्या हाती कर / बालकाचा //५//
माझे जे नाही ते / श्रेय मज देसी /
पदारात घेसी / दोष माझे //६//
कृपाळू दातारा / तुझी आहे देन /
आमचे जीवन / तुझी लीला //७//
नको नको मज / कर्तेपणा आता /
विंधुनी अहंता / तारी मज //८//
बुधवार, १० ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
