देवा तू दयाळु / पाळिसी पाखरा /
नाही तरी चारा / कोण घाली //१//
वाहती या डोळा / देवा अश्रुधारा /
तुझ्या उपकारा / कैसे वर्णु //२//
तुझ्यामुळे देवा /जग हे जगते /
कोण यांना देते / अन्नपाणी //३//
तूच दया प्रेम / तूच बंधुभाव /
जगती अभाव / नाही तुझा //४//
करतो मर्दन / अभिमान्याचे तू /
लहान वासरा / दूध देसी //५//
बळी कान पिळी / हे बोल फुकाचे /
जनसामान्यांचे / तुझे राज्य //६//
अजाण बालके / किटके नाजुक /
जगती कित्येक / युगे झाली //७//
आम्ही तुझा देवा / केला अंगीकार /
तुझा शिरी भार / वागवितो //८//
शनिवार, २७ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
