माझ्या प्रवासाला / नाही पोहोचणे /
ललाटी फिरणे / लिहीलेले //१//
रुजणे ना मज / काळात कुठल्या /
आभाळ भाळी या / कोरलेले //२//
शिकणे माझे हे / कधीही संपेना /
मजला रुचेना / पदवीदान //३//
काय मिळविणे / कुठे मज जाणे /
चक्र हे कशाला / पायी माझ्या //४//
तुझे नित्य नवे / उन्मेष पाहणे
आणि आनंदणे / पुन्हा पुन्हा //५//
तुझे वैद्यपण / माझ्या वेडावरी /
टिपरी टिपरी / वर झडे //६//
देवा तुज आहे / सोस हा कसला /
आनंद तुजला / काय मिळे //७//
असो तुझी हौस / देई मला बळ /
तुझ्यासवे खेळ / खेळतो मी //८//
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
