नाही कुणी कुणाचे
सारे इथे स्वयंभू
इथले आकाश सारे
प्रत्येक एकट्याचे
सा-याच रानवाटा
विस्तीर्ण पसरलेल्या
सुखदुःख ऐसपैस
प्रत्येक एकट्याचे
मनमुक्त कंठ गातो
गाणे स्वतंत्रतेचे
दुस-यावरी न ओझे
प्रत्येक एकट्याचे
ज्याचा तयास वाटा
तक्रार ना कुणाची
ज्याची तयास साथ
प्रत्येक एकट्याची
नाही गुन्हा कुणाचा
दुस-यावरी न सत्ता
जागा जगात देव
प्रत्येक एकट्याचा
शनिवार, १३ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
