देवा उपभोग / नाही रे शाश्वत /
तुझे नाम देत / सुख सदा //१//
विवंचना किंवा / वंचना कसली /
नामाची सावली / सदा शिरी //२//
देवा तू घेतले / मजला पोटाशी /
खूण ही गाठीशी / बांधली मी //३//
अंतरीची तार / जुळली आपली /
जाईना तुटली / कदापिही //४//
मागणे एवढे / झाले माझे पुरे /
आता काही नुरे / चिंता मज //५//
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २००७
माता भगवतिके श्री चरणोंमें समर्पित
*
DEDICATED TO THE DIVINE LOTUS FEET OF MOTHER GODDESS BHAGAVATI
*
